Grey heron-Ardea cinera
बक गणातील हा पक्षी असून ( order -CICONIIFORMS ) ह्या गणातील भारतामधील पक्षीकुले म्हणजे आरडीडी (Family-ARDEIDAE ) ( क्वाक ,बगळा वगैरे ) सिकोनिडी ( CICONIIDAE) ( करकोचा ) थ्रेस्कीऑरनिथीडी ( THRESKIORNITHIDAE) अवाक ( Ibis) रोहित ( Flamingo ) ( PHOENICOPTERIDAE )
क्वाक व बगळा ( HERONS & ERGETS ) हे लांब पायाचे पक्षी असून पायावर गुडघ्याखाली पिसे नसतात,त्यांच्या पायाची बोटे सुटी असतात ,,लांब,बारीक आणि लवचिक मानेच्या ह्या पक्ष्यांची चोच भाल्यासारखी असते
पाणथळ जागी आढळून येणारा हा राखी बगळा कुरवपुर कर्नाटक येथे कृष्णा नदीमध्ये असलेल्या बेटावर दिसून आला. दूरवरून छोटा दिसणारा साधारणत : ७५ ते ९८ सेमी उंच आढळून येतो. करकोच्या प्रमाणे हडकुळा लांब व उघड्या पायाचा असतो. राखी रंगाचा असतो म्हणून यास राखी बगळा असे म्हणतात. डोके व मान पांढऱ्या रंगाची असते. शरीराचा खालचा भाग राखट पांढऱ्या रंगाचा असतो.`इंग्रजी s आकाराची लांबट मान असून डोके अरुंद असते व जाड निमुळती खंजिरासारखी चोच असते. डोक्यावर लांब काळा तुरा असतो. मानेच्या मध्यावर काळ्या ठिपक्यांची ओळ असते.छातिवर लांब काळ्या रेघा असलेली पांढरी पिसे असतात. मादी नरासारखी असते फक्त तिच्या डोक्यावरचा तुरा व छातीवरील पिसे उठावदार नसतात.
घरटे माचासारखे असून काटक्यांचे बनवलेले असते. माचाच्या मध्यभागी उथळ खळगा असतो त्यात थोडे गवत असते. मादी एका वेळेला ३ ते ४ अंडी देते. अंडी गडद निळसर हिरव्या रंगांची असतात.
REFERANCE : भारतीय पक्षी -सलिम अली व लईक फतेअली अनुवाद -रा.वि.सोवनि