Scintific name: Estrilda Amandava
अगदी छोटासा हा पक्षी चिमणीच्या आकाराचा साधारणत : १० सेमी लांबीचा . याचे दर्शन आम्हाला ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर येथे झाले. तेलिया तलावाच्या गवतात अचानक दिसलेला. आमचा गाईड वसंत सोनुले याने याची माहिती करून दिली तर दिसता क्षणी मनास खूप भावला. नर व मादी दोघेही सारखेच दिसतात . तपकिरी रंगावर पांढरे ठिपके तर किरमिजी रंगाच चोच व बुड असते .कळपाने हा पक्षी वास्तव्य करतो.तलावाच्या जलाशयाच्या ओलसर भागातील उंच गवतात किंवा बांबूच्या झाडामध्ये याचा वावर असतो .याचे घरटे गोलाकार आतून गवत व पिसे अस्तर असते . झुडुपाच्या बुडाशी घरटे आढळते.किडे व गवताचे बी असे खाण्यास लागते.विणीच्या हंगामात नर "टवीट टवीट " असा मंद आवाज करतो. यांची अंडी रंगाने पांढरी शुभ्र असतात.साधारणत: ४ ते ७ अंडी हि लाल मुनिया देते.
Tuesday, January 22, 2013
Wednesday, January 16, 2013
टिटवी यमाची तरळीण I टिटाव टिटाव टिटाव I तीड तीड तीड जाणगा II
टिटवी ( Red -watteled Lapwing )
टिटवी आपल्या सर्वांच्या परिचयाचा पक्षी . मुळातच रात्री अपरात्री टिट्-टिट्-ट्यू टिट् किंवा टिट्-ट्यू-ट्यू-टिट् असा आवाज आपल्याला ऐकिवात येतो.आपसूकच आपल्याकडच्या समजुतीप्रमाणे काहीतरी विपरीताची चाहूल हा आवाज करून देतो / टिटवी घरावरून ओरडत जाणे अशुभ समजतात.अशी वेडी भाबडी अंधश्रद्धा जनमानसात आहे.हा आवाज टिटवी या पक्षाचा असतो पिलांवर किंवा घरट्यावर संकट आले तर ते आक्रमाकाच्या डोक्याजवळ रागारागाने आवाज करतात.टिटवी चा सर्वसामान्यात इतका परिचयाचा आहे कि त्यावर भारुड , म्हणी आहेत .
भारुड -टिटवी
टिटवी. एक ग्रामावरी जाऊन ।
एक नदीतीर पाहून ।
तेथें टिटवी करी शयन ।
दोन्ही पायांत खडा धरून गा ॥ १ ॥
टिटवी यमाची तराळीण । टिटाव टिटाव टिटाव ।
तीड तीड तीड जाणगा ॥ध्रु०॥
मरेल चौगुल्याची सून । पाटलाचे चौघेजण ।
कुळकर्ण्याची लाडकी सून । आता गावात राहिले कोण गा ............
देशमुख देशपांडे चौधरी जाण । शेटे महाजन नेईन । चौगुल्याचे जवळ मरण । आता गावात नाही कोण गा ॥ 3 ॥
नाईक वाड्यास धरी। शेलकी देशमुखाची पोरी । याची गणना कोण करी । आता गावात नाही थोरी गा ॥ ४ ॥
आता गावा वचने हीन सारा । केवढा टिटवी दरारा । गांवांत हिंडता चुकेल फेरा । महारमांगांचा तुला आसरा ॥ ५ ॥
लव्हार सुतार बलुते बारा । माळी तेली वाण्यास दरारा । सुनेकरासी दिधला थारा । म्हणोनी हरिभजन करा गा ॥ ६ ॥
आता नाही कोणास कोण । शेवट मारीन मी नेऊन । माझे संगती मांगीण । एका जनार्दनी लहानपण थोर गा ॥ ७ ॥
संत एकनाथ
referance : khapre. org
अशी ही टिटवी तिला संस्कृत मध्ये टिट्टीभ म्हणतात .हिंदीमध्ये तितुरी किंवा तितीरी म्हणतात .हा पक्षी टिट्टीभ/तुतवार कुळातील ( FAMILY CHARADRIIDAE ) आहे .
टिटवीच्या दोन जाती आहेत : पहिली रक्तमुखी टिटवी व दुसरी पीतमुखी टिटवी.
१. रक्तमुखी टिटवी/ताम्रमुखी टिटवी -Red -watteled Lapwing
शास्त्रीय नाव -Vanellus indicus
२.पीतमुखी टिटवी.-Yellow Wattled Lapwing
शास्त्रीय नाव -Vanellus malabaricus
टिटवी हा पक्षी सुमारे ३३ सें. मी. आकाराचा असून याची चोच लाल, डोके, गळा, छाती काळ्या रंगाची, त्या खाली पोटाकडे पांढरा रंग तर पाठीकडून पंखांपर्यंतचा भाग तपकिरी रंगाचा, पाय लांबट पिवळ्या रंगाचे असतात आणि यांची मुख्य ओळख म्हणजे डोळ्याजवळ पुढे किरमिजी रंगांची मांसल गाठन ( wattle) . पीतमुखी च्या डोळ्यांच्या पुढे पिवळ्या रंगाची मांसल गलुली असून दोन्ही बाजूंच्या गलुल्या चोचीवर मिळतात; हाच काय तो पीत व रक्तमुखि टिटवी मध्ये फरक असतो. बहुरंगी व दिसण्यास सुंदर असा पक्षी. नर-मादी दिसायला सारखेच असतात.
माळरानांच्या पाणवठय़ाच्या परिसरात लागवडीखालच्या शेतात, कुरणात व तलाव, नद्या यांच्या आसपास,हमखास आढळते .छोट्या छोटया उड्या मारत चोच जमिनीकडे करून हे पक्षी भक्ष्य शोधतात.ते अतिशय सावध असतात त्यामुळे रात्रि जागे व दिवसा त्यांचा भक्ष्य शोधण्याचा उद्योग सुरु असतो.त्यांच्या जवळ एखादा माणूस किंवा जनावर आले तर ते क्षुब्द होऊन डिड-यी -डू- इट किंवा पिटी -टू -डू -इट असा आवाज करतात.सदैव जागरूक असल्यामुळे संकटाचा संशय येताच ओरडून ही सगळ्यांना सावध करते.रात्री याचे ओरडणे एकूण काही लोक विनाकारण घाबरतात. मात्र या ओरडण्यामागे परिसरात कुत्रा, साप किंवा अन्य त्रासदायक जनावर आल्याची सूचना असते. टिटवीच्या आवाजावर अनेक पक्षी आपली सुरक्षा करून घेतात, कारण धोकादायक जनावर किंवा मानवाचा वावर याची सूचना टिटवीच पहिल्यांदा देते."बिनतारी' धोक्याची सूचना देणारी यंत्रणा असेही म्हटले जाते .कारण पशुपक्ष्यांना "बिनतारी' धोक्याची सूचना देणारी ही पक्षीयंत्रणा असून, शत्रूपासून सावध करण्याकरिता ती "टीटीऽऽव टी' असा आवाज काढते.
उघड्या जमिनीवर पायाने उकरून केलेला खड्डा म्हणजे या पक्षाचे घरटे..त्यात काहीवेळा वाळूचे दगड आढळतात.आटलेली तळी,निकस जमीन कधी तर सपाट कोन्क्रीट च्या छतावर ,
रूळालगतच्या दगडामध्येही घरटी आढळतात. या घरट्या मध्ये मादी ३-४ अंडी देते .राखट तपकिरी त्यावर काळ्या रंगांचे ठिपके असा अड्यांचा रंग असतो.तसाच काहीसा पिलांचा असतो .तो इतका बेमालूम सभोवतालच्या रंगासारखा असतो कि आपल्याला ओळखू येत नाही.विणीचा हंगाम मार्च ते ऑगस्ट असतो.पक्षी हिमालयाच्या १८०० मी. उंचीपर्यंत संपूर्ण भारतभर आढळणारा सर्वसामान्य पक्षी असून भारताशिवाय तो बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, इराण, इराक वगैरे देशांमध्येही आढळतो.
Sunday, January 6, 2013
कापशी -किंवा काळ्या पंखाची घार (Black-winged Kite)
कापशी ची भेट होणार हे पूर्व नियोजित असावे असेच घडले .रात्री ९च्या सुमारास पांढऱ्या शुभ्र रंगाचा कावळ्याच्या आकाराचा एक पक्षी दवाखान्याच्या कॅम्पस मध्ये सुंदर भरारी घेऊन दिसेनासा झाला.पहिल्यांदा मला तर वाटले पांढरे घुबड असावे. दवाखान्याच्या परिसरात भरपूर झाडी असल्या कारणाने तो कुठे गेला हे कळू शकले नाही.मग काय आणखी उस्तुक झालो काय असेल ते . पण काय पुस्तकात काही सापडले नाही.हे झाले ते त्यादिवशी रविवार होता ३० डिसे. २०१२. २/१२/२०१२ रोजी सकाळी १० च्या सुमारास मी नाशिकहून दिंडोरीला जात होतो. काय अचानक हे महाशय आमच्या समोरून एकाच जागी हेलीकॉप्टर सारखे "हॉवरींग" करत त्याच्या सावजाचा अंदाज घेत एका लाकडाच्या खांबावर बसले. मग काय आमची बाईक थांबवली आणि फोटोस घेतले तरीपण मोठ्या रेंजची लेन्स असावी असे वाटले. पुन्हा दोन दिवसापूर्वी यांचे दर्शन झाले दोन कापशी दिसल्या नासिक-दिंडोरी रस्त्यावर आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या पुढे ,पण कॅमेऱ्यात बंदिस्थ नाही करता आले. नंतर पुन्हा दिंडोरी जकात नाक्याच्या तिथे कापशी दिसली.तारेवर बसलेली balancing करताना.लपून फोटोस घेतले . थोडे जवळून घ्यायला गेलो तर पुन्हा एक भरारी- फोटोत एकच पाय दिसतोय .कापशीला एकच पाय होता का ? ते काही कळले नाही . तर आपण कापाशीची माहिती करून घेवूयात
कापशी किंवा काळ्या पंखाची घार
शास्त्रीय नाव : Elanus caeruleus, इलेनस सेरुलेअस
इंग्लिश: Black-winged Kite, ब्लॅक विंग्ड काइट;
संस्कृत- कुमुद, शबलिका
हा मध्यम शुष्क प्रदेशांत आढळणारा दिवसा आढळणारा दिनचर शिकारी पक्षी आहे. या पक्ष्याचे घारीशी साम्य असते. याच्या दुभंगलेल्या शेपटीमुळे हा घार कुटुंबात गणला जातो. ३३-३५ सेमी सामन्यात: लांबी वजन २५० ते ३०० ग्रॅम असते.दिसायला अतिशय देखणी व दिमाखदार घार रंगाने पांढरी शुभ्र / राखाडी आढळते.डोक्यावर,पोटाकडे रंग हा अगदी पांढराशुभ्र आणि कापसासारखा मऊमऊ दिसणारा असतो म्हणून ही ‘कापशी’. पंखांचा आणि इतरत्र राखाडी रंग असून खांद्यावरचा रंग गडद काळा असतो. याच कारणाकरिता याला/हिला "ब्लॅक विंग्ड काईट’/ ब्लॅक शोल्डर काईट "म्हणतात.यांचे डोळे लाल किंवा पिवळे असतात. डोळ्यांच्या वर काळा भाग असतो.यांची पिल्ले मात्र काहीशी करड्या रंगाची असून त्यावर बारीक बारीक ठिपके असतात.यांची पिल्ले मात्र काहीशी करड्या रंगाची असून त्यावर बारीक बारीक ठिपके असतात.याचे मुख्य खाद्य लहान उंदीर, व सरडे, छोटे पक्षी आणि मोठे कीटक,किडे आहेत. आकाशात एकाच जागी स्थिर घिरट्या घालत तो शिकार करतो.शिकारी पक्षी असल्यामुळे अर्थातच तिक्ष्ण नजर, धारदार नख्या आणि बाकदार, अणुकुचीदार चोच यांनी याला शिकार पकडणे आणि पकडलेली शिकार फाडून खाण्यासाठी मदत होते.मादी ३-४ अंडी देऊन २५ दिवस उबवते. मादी पूर्णवेळ पिलांसाठी देते .नर पिलांना व मादीला अन्न पुरवण्याचे काम करतो . कापशी शांतशी असते पण विणीच्या हंगामात कंठ फुटतो. उडताना ची ची ची आवाज करतात पण हा आवाज सिल्वर गुल या पक्ष्याशी मिळता जुळता असल्यामुळे संभ्रम निर्माण करतो
तर अशी हि गिर्रेबाज कापशी बघायला विसरू नका
Thursday, January 3, 2013
पारवा ( BLUE ROCK PIGEON )
dr.abhays pic |
कपोत गणात order COLUMBIFORMES हे पारवे येतात इंग्रजी मध्ये यांना blue rock pigeon असे म्हणतात तर scientific name -columba livia आहे . मराठीत आपण पारवे असे म्हणतो
दगडी पाटीसारख्या राखट रंगाचा हा पक्षी सर्वांना परिचित आहे .गळ्यावर आणि छातीवर हिरवा,जांभळा आणि किरीमिजी ह्या रंगांची चमक असते.पंखावर दोन आडवे पट्टे व शेपटीच्या टोकावर एक आडवा काळा पट्टा असतो .हा सामन्यात :रोजच्या परिचयाचा पक्षी आहे.मानवी वस्तीमध्ये हा बिनदिक्खत पणे आढळतो ज्या रानटी जाती पासून आजच्या विविध प्रकारच्या पाळीव जाती निर्माण झाल्या आहेत त्या जातीचा पक्षी डोंगराळ भागातील माळरानावर वस्ती करतो व शक्यतो दाट जंगले टाळतो.बहुतेक ठिकाणी हा पक्षी पाळीव जातीचाच झाला आहे.जवळ जवळ भारताच्या प्रत्येक गावात पाराव्यांची स्थानिक लोकवस्ती असते.हे पक्षी गावातल्या रहदारीला.गजबजाटाला पक्के रुळलेले दिसतात.त्यांच्या राहण्याची ठिकाणे उंचावर मोठ मोठ्या इमारती ,गोदामे ,कारखाने मशिदी,पडक्या इमारती ,जुने मोडकळीस आलेले किल्ले,ओसाड घरे ,विहिरी इ .ठिकाणी आढळतात .गुटूर गुर असा आवाज करत हे पक्षी आज शहरी भागात मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यांचे आवडते खाद्य शेतातातील धान्य व रुजलेले अंकुर .त्यांचे घरटे म्हणजे गवत व काटाक्यांचे ओबडधोबड अस्तर असते,पांढऱ्या रंगाची स्वच्छ २ अंडी हे पक्षी सामन्यात : त्यांच्या कुळ धर्मानुसार देतात.नर ,मादी असे दोघे जोडीने आढळतात.
Subscribe to:
Posts (Atom)