Tuesday, January 22, 2013

RED MUNIA -लाल किंवा किंवा लाला मुनिया

Scintific name: Estrilda Amandava


अगदी छोटासा हा पक्षी चिमणीच्या आकाराचा साधारणत : १० सेमी लांबीचा . याचे दर्शन आम्हाला ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर येथे झाले. तेलिया तलावाच्या गवतात अचानक दिसलेला. आमचा गाईड वसंत सोनुले याने याची माहिती करून दिली तर दिसता क्षणी मनास खूप भावला. नर व मादी दोघेही सारखेच दिसतात . तपकिरी रंगावर पांढरे ठिपके तर किरमिजी रंगाच चोच व बुड असते .कळपाने हा पक्षी वास्तव्य करतो.तलावाच्या जलाशयाच्या ओलसर भागातील उंच गवतात किंवा बांबूच्या झाडामध्ये याचा वावर असतो .याचे घरटे गोलाकार आतून गवत व पिसे अस्तर असते . झुडुपाच्या बुडाशी घरटे आढळते.किडे व गवताचे बी असे खाण्यास लागते.विणीच्या हंगामात नर  "टवीट टवीट " असा मंद आवाज करतो. यांची अंडी रंगाने पांढरी शुभ्र असतात.साधारणत: ४ ते ७ अंडी हि लाल मुनिया देते.

No comments:

Post a Comment