Sunday, January 6, 2013

कापशी -किंवा काळ्या पंखाची घार (Black-winged Kite)


           कापशी ची भेट होणार हे पूर्व नियोजित असावे असेच घडले .रात्री ९च्या  सुमारास पांढऱ्या शुभ्र रंगाचा कावळ्याच्या आकाराचा एक पक्षी दवाखान्याच्या कॅम्पस मध्ये सुंदर भरारी घेऊन दिसेनासा झाला.पहिल्यांदा मला  तर वाटले पांढरे घुबड असावे. दवाखान्याच्या परिसरात भरपूर झाडी असल्या कारणाने तो कुठे गेला हे कळू शकले नाही.मग काय आणखी उस्तुक झालो काय असेल ते . पण काय पुस्तकात काही सापडले नाही.हे झाले ते त्यादिवशी रविवार होता ३० डिसे. २०१२. २/१२/२०१२ रोजी सकाळी १० च्या सुमारास मी नाशिकहून दिंडोरीला जात होतो. काय अचानक हे महाशय आमच्या समोरून एकाच जागी हेलीकॉप्टर सारखे "हॉवरींग" करत त्याच्या सावजाचा अंदाज घेत एका लाकडाच्या खांबावर बसले. मग काय आमची बाईक थांबवली आणि फोटोस घेतले तरीपण मोठ्या रेंजची लेन्स असावी असे वाटले. पुन्हा दोन दिवसापूर्वी यांचे दर्शन झाले दोन कापशी दिसल्या नासिक-दिंडोरी रस्त्यावर आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या पुढे ,पण कॅमेऱ्यात बंदिस्थ नाही करता आले. नंतर पुन्हा दिंडोरी जकात नाक्याच्या तिथे कापशी दिसली.तारेवर बसलेली balancing करताना.लपून फोटोस घेतले . थोडे जवळून घ्यायला गेलो तर पुन्हा एक भरारी- फोटोत एकच पाय दिसतोय .कापशीला एकच पाय होता का ? ते काही कळले नाही . तर आपण कापाशीची माहिती करून घेवूयात 

कापशी किंवा काळ्या पंखाची घार
शास्त्रीय नाव : Elanus caeruleus, इलेनस सेरुलेअस 
इंग्लिश: Black-winged Kite, ब्लॅक विंग्ड काइट;
संस्कृत- कुमुद, शबलिका
हा मध्यम शुष्क प्रदेशांत आढळणारा दिवसा आढळणारा  दिनचर शिकारी पक्षी आहे. या पक्ष्याचे घारीशी साम्य असते. याच्या दुभंगलेल्या शेपटीमुळे हा घार कुटुंबात  गणला जातो. ३३-३५ सेमी सामन्यात: लांबी  वजन  २५० ते ३०० ग्रॅम  असते.दिसायला अतिशय देखणी व दिमाखदार घार रंगाने पांढरी शुभ्र / राखाडी आढळते.डोक्यावर,पोटाकडे रंग हा अगदी पांढराशुभ्र आणि कापसासारखा मऊमऊ दिसणारा असतो म्हणून ही ‘कापशी’. पंखांचा आणि इतरत्र राखाडी रंग असून खांद्यावरचा रंग गडद काळा असतो. याच कारणाकरिता याला/हिला  "ब्लॅक विंग्ड काईट’/ ब्लॅक शोल्डर काईट "म्हणतात.यांचे डोळे लाल किंवा पिवळे असतात. डोळ्यांच्या वर काळा भाग असतो.यांची पिल्ले मात्र काहीशी करड्या रंगाची असून त्यावर बारीक बारीक ठिपके असतात.यांची पिल्ले मात्र काहीशी करड्या रंगाची असून त्यावर बारीक बारीक ठिपके असतात.याचे मुख्य खाद्य लहान उंदीर, व सरडे, छोटे पक्षी आणि मोठे कीटक,किडे आहेत. आकाशात एकाच जागी स्थिर घिरट्या घालत तो शिकार करतो.शिकारी पक्षी असल्यामुळे अर्थातच तिक्ष्ण नजर, धारदार नख्या आणि बाकदार, अणुकुचीदार चोच यांनी याला शिकार पकडणे आणि पकडलेली शिकार फाडून खाण्यासाठी मदत होते.मादी ३-४ अंडी देऊन २५ दिवस उबवते. मादी पूर्णवेळ पिलांसाठी देते .नर पिलांना व मादीला अन्न पुरवण्याचे काम करतो . कापशी शांतशी  असते पण विणीच्या हंगामात कंठ फुटतो. उडताना ची ची ची  आवाज करतात पण हा आवाज सिल्वर गुल या पक्ष्याशी मिळता जुळता असल्यामुळे संभ्रम निर्माण करतो
 तर अशी हि गिर्रेबाज कापशी बघायला विसरू नका 


No comments:

Post a Comment