टिटवी ( Red -watteled Lapwing )
टिटवी आपल्या सर्वांच्या परिचयाचा पक्षी . मुळातच रात्री अपरात्री टिट्-टिट्-ट्यू टिट् किंवा टिट्-ट्यू-ट्यू-टिट् असा आवाज आपल्याला ऐकिवात येतो.आपसूकच आपल्याकडच्या समजुतीप्रमाणे काहीतरी विपरीताची चाहूल हा आवाज करून देतो / टिटवी घरावरून ओरडत जाणे अशुभ समजतात.अशी वेडी भाबडी अंधश्रद्धा जनमानसात आहे.हा आवाज टिटवी या पक्षाचा असतो पिलांवर किंवा घरट्यावर संकट आले तर ते आक्रमाकाच्या डोक्याजवळ रागारागाने आवाज करतात.टिटवी चा सर्वसामान्यात इतका परिचयाचा आहे कि त्यावर भारुड , म्हणी आहेत .
भारुड -टिटवी
टिटवी. एक ग्रामावरी जाऊन ।
एक नदीतीर पाहून ।
तेथें टिटवी करी शयन ।
दोन्ही पायांत खडा धरून गा ॥ १ ॥
टिटवी यमाची तराळीण । टिटाव टिटाव टिटाव ।
तीड तीड तीड जाणगा ॥ध्रु०॥
मरेल चौगुल्याची सून । पाटलाचे चौघेजण ।
कुळकर्ण्याची लाडकी सून । आता गावात राहिले कोण गा ............
देशमुख देशपांडे चौधरी जाण । शेटे महाजन नेईन । चौगुल्याचे जवळ मरण । आता गावात नाही कोण गा ॥ 3 ॥
नाईक वाड्यास धरी। शेलकी देशमुखाची पोरी । याची गणना कोण करी । आता गावात नाही थोरी गा ॥ ४ ॥
आता गावा वचने हीन सारा । केवढा टिटवी दरारा । गांवांत हिंडता चुकेल फेरा । महारमांगांचा तुला आसरा ॥ ५ ॥
लव्हार सुतार बलुते बारा । माळी तेली वाण्यास दरारा । सुनेकरासी दिधला थारा । म्हणोनी हरिभजन करा गा ॥ ६ ॥
आता नाही कोणास कोण । शेवट मारीन मी नेऊन । माझे संगती मांगीण । एका जनार्दनी लहानपण थोर गा ॥ ७ ॥
संत एकनाथ
referance : khapre. org
अशी ही टिटवी तिला संस्कृत मध्ये टिट्टीभ म्हणतात .हिंदीमध्ये तितुरी किंवा तितीरी म्हणतात .हा पक्षी टिट्टीभ/तुतवार कुळातील ( FAMILY CHARADRIIDAE ) आहे .
टिटवीच्या दोन जाती आहेत : पहिली रक्तमुखी टिटवी व दुसरी पीतमुखी टिटवी.
१. रक्तमुखी टिटवी/ताम्रमुखी टिटवी -Red -watteled Lapwing
शास्त्रीय नाव -Vanellus indicus
२.पीतमुखी टिटवी.-Yellow Wattled Lapwing
शास्त्रीय नाव -Vanellus malabaricus
टिटवी हा पक्षी सुमारे ३३ सें. मी. आकाराचा असून याची चोच लाल, डोके, गळा, छाती काळ्या रंगाची, त्या खाली पोटाकडे पांढरा रंग तर पाठीकडून पंखांपर्यंतचा भाग तपकिरी रंगाचा, पाय लांबट पिवळ्या रंगाचे असतात आणि यांची मुख्य ओळख म्हणजे डोळ्याजवळ पुढे किरमिजी रंगांची मांसल गाठन ( wattle) . पीतमुखी च्या डोळ्यांच्या पुढे पिवळ्या रंगाची मांसल गलुली असून दोन्ही बाजूंच्या गलुल्या चोचीवर मिळतात; हाच काय तो पीत व रक्तमुखि टिटवी मध्ये फरक असतो. बहुरंगी व दिसण्यास सुंदर असा पक्षी. नर-मादी दिसायला सारखेच असतात.
माळरानांच्या पाणवठय़ाच्या परिसरात लागवडीखालच्या शेतात, कुरणात व तलाव, नद्या यांच्या आसपास,हमखास आढळते .छोट्या छोटया उड्या मारत चोच जमिनीकडे करून हे पक्षी भक्ष्य शोधतात.ते अतिशय सावध असतात त्यामुळे रात्रि जागे व दिवसा त्यांचा भक्ष्य शोधण्याचा उद्योग सुरु असतो.त्यांच्या जवळ एखादा माणूस किंवा जनावर आले तर ते क्षुब्द होऊन डिड-यी -डू- इट किंवा पिटी -टू -डू -इट असा आवाज करतात.सदैव जागरूक असल्यामुळे संकटाचा संशय येताच ओरडून ही सगळ्यांना सावध करते.रात्री याचे ओरडणे एकूण काही लोक विनाकारण घाबरतात. मात्र या ओरडण्यामागे परिसरात कुत्रा, साप किंवा अन्य त्रासदायक जनावर आल्याची सूचना असते. टिटवीच्या आवाजावर अनेक पक्षी आपली सुरक्षा करून घेतात, कारण धोकादायक जनावर किंवा मानवाचा वावर याची सूचना टिटवीच पहिल्यांदा देते."बिनतारी' धोक्याची सूचना देणारी यंत्रणा असेही म्हटले जाते .कारण पशुपक्ष्यांना "बिनतारी' धोक्याची सूचना देणारी ही पक्षीयंत्रणा असून, शत्रूपासून सावध करण्याकरिता ती "टीटीऽऽव टी' असा आवाज काढते.
उघड्या जमिनीवर पायाने उकरून केलेला खड्डा म्हणजे या पक्षाचे घरटे..त्यात काहीवेळा वाळूचे दगड आढळतात.आटलेली तळी,निकस जमीन कधी तर सपाट कोन्क्रीट च्या छतावर ,
रूळालगतच्या दगडामध्येही घरटी आढळतात. या घरट्या मध्ये मादी ३-४ अंडी देते .राखट तपकिरी त्यावर काळ्या रंगांचे ठिपके असा अड्यांचा रंग असतो.तसाच काहीसा पिलांचा असतो .तो इतका बेमालूम सभोवतालच्या रंगासारखा असतो कि आपल्याला ओळखू येत नाही.विणीचा हंगाम मार्च ते ऑगस्ट असतो.पक्षी हिमालयाच्या १८०० मी. उंचीपर्यंत संपूर्ण भारतभर आढळणारा सर्वसामान्य पक्षी असून भारताशिवाय तो बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, इराण, इराक वगैरे देशांमध्येही आढळतो.
good collection . please write complete bharud
ReplyDeleteKhup Sundar Varanan kele ahe.
ReplyDeleteKhup chan varanan kele aahe
ReplyDelete